Pages

Pages

Saturday, May 20, 2017

काय गो, कांज्याला काय केलस ?

काय गो, कांज्याला काय केलस ?

अशी जिथे एकमेकींना साद घातली जाते, त्या समाजात खाद्यसंस्कृती ही प्रेमाने जपली जाते हे नक्की समजावे. मी ह्याच समाजातली.

कोळी हे दर्याचे राजे, उंच लातांवर स्वार होउन आपले गलबत खोल दर्यात नेणे हे तर मोठ्या जीगरीचे काम. काही पंचतार-शंभर वर्षांपूर्वी पर्यंत छोट्या होड्या किंवा शिडाचे गलबत घेउन मासे मारी करायची हे कोळी समाजाचे उदरनिर्वाहाचे साधन. वाफेवर चालणारी गलबते ही १८ व्या शतकात England मध्ये निर्माण झाली. भारतात power engines खूप नंतर आली. म्हणजे होड्या, गलबते ही वाऱ्यावरच चालत होती आपल्या काढे, त्यात घात जास्त होत. इतक्या जीवावरचा व्यवसाय का करत असतील हे ?

हा समाज जिथे पाणी तिथे तो, मग समुद्र असो की खाडी. ह्या समाजाचं नैपुण्य ते गलबत चालवण्यात. त्यांचे चंद्रावर अतिशय प्रेम, कारण तोच त्यांना लाटांच्या चढ उताराचे गुपित सांगतो. आमचे कोळी समुद्र कुठे खोल आहे वा कुठे उथळ हे बरोबर लांबूनच ओळखतात. आपला किनारा आणि समुद्र अगदी पायाखालच्या रस्ताच जणू. अशी हुकुमत ज्याच्या अंगी तो नक्कीच तिथे शिकार करणार हे अगदी ह्या पृथ्वीच्या निर्मिती पासून ठरलेलंच आहे.

हे जरी खरे तरी मासे मोसमा प्रमाणे खाणे हे अंगवळणी नियम. तो मोडायचा नाही कारण उदरनिर्वाहाचे साधनच ते. असे नियम कासोशीने पाळले जातात. पावसाळा म्हजे आमची ‘आगोट’, जवळ आलीच आहे, थोड्याच दिवसात गलबते आणि trawlers किनाऱ्यावर चढवलेल्या दिसतील. जुन्या काळात कोळी बुधीत्वावादा प्रमाणे पूर्ण चार महिने मासेमारी बंद असे. हल्ली मात्र सरकारच्या नियमानुसार बंद असते. मग जर मासेमारी बंद असते तर हे लोक खातात काय?

आगोटीत जाळे विणायचे आणि डाग-दुजी करायचे काम चालू असते

वर म्हटल्याप्रमाणे पावसाळ्या आधी येतो उन्हाळा, म्हणजे भरपूर सूर्य प्रकाश मग ह्याचा उपयोग नुसते मासेमारी करण्यासाठीच नाही तर चार महिने मासेमारी बंद असताना आणि वर्षभर लागणारी बेगमी तयार कारला उपयुक्त, तर कोळी समाजाची बेगमी काय असेल तुम्ही ओळखलंच असेल! सुके मासे, कोळी मसाला, आमसुले, चिंच, आंबोशी, तांदळाच्या फेण्या/ पापड ही होय.

सुके मासायांचे प्रकार जे तुम्हाला प्रत्येक कोळी घरातून मिळतील असे, वाकटी, बोंबील, सोडे, अंबाड/ करंदी, कोलिम/ जवळा, बगा. हे न खारवलेले म्हणजे मीठ न लावता सुकवलेले. मीठ लावून सुकवलेले म्हणजे खारवलेले मासे. घोळ, सारंग, बगा, बागडे इत्यादी. ह्याचा वापर कसा करतात ते पुढे कळेल.

कोळी स्वयंपाकात सुर्वातीला सरंगा, बोंबील, तारली, करली, सुरमई, बगा, चिंबोरी, शेवंडी ह्यांच्या उकडी किंवा वाकटी, बोंबील, बागडे हे भाजून ह्यांचा समावेश असे. उकड नुसती हळद मीठ घालून केली जाई. मसाल्याचा वापर नंतरचा, बहुतेक “Spice route” अस्तित्वात आल्या नंतरचा. एकच मसाला सगळ्या कांज्याना. रोजचं कांजी म्हणजे नुसता रस असतो, त्यात वैविध्य ते मास्यांचे.

कोळी मासेमारी जी स्वतः साठी करत होते ते इतर समाज मागणी करू लागल्या मुळे मग barter sytem / वस्तू विनिमय प्रणाली स्थापित झाली. माळ्या कडून भाजी मिळे, आगऱ्या कडून धान्य. नुसता मास्यानंवर जगणारा कोळी समाजच्या जेवणात हळू-हळू तांदूळ वेग वेगळ्या रूपात सामिल झाला. धान (भात), चावलाची रोटी (तांदळाची भाकरी), पोळे (घावाने) असे रोजचे पदार्थ ओघाने अस्तीत्वात आले. ज्या जिव्हेला नुसत्या मास्यांची चव माहित होती तीला नुसती भाजी कशी रुचेल? म्हणून मग भाजीत मासे घालून शिजवू लागले कोळी. अश्या भाज्या ‘इसावानाच्या’. हा शब्द म्हणजे  अपभ्रंशीत इंग्रजी ‘essence’. आपण तांदळाबद्दल बोलत आहोत तर इथे नमूद करावे लागेल की नंतर कोळीही शेती करू लागले आणि भात, वाल, तोंडली इत्यादी भाज्यांचे पीक घेऊ लागले. तांदळापासून अनेक पदार्थ बनवू लागले, तांदळाचे पीठ (गूळ घालून), घाऱ्या (वडे), मूंगोरी, पिठाची बोरे, खांडवी असे अनेक विवध.


सुके मास्यांचे कांजी (कालवण) बरेचदा खोबर्याचे वाटण लावून करतात. वाटणाने वशाटपणा कमी होतो आणि कालवणाला घटपणा येतो. सुके मासे जेव्हा barter मध्ये देवाण – घेवाणीसाठी वापरतात तेव्हा त्याला ‘केजं’ असे म्हणतात. अजूनही अलिबाग मध्ये ही पद्धत प्रचलित आहे.

मॉन्सून संपतो नारळ पौर्णिमेला. सर्वज्ञात आहे की अगस्ती मुनीला शांत करण्यासाठी दर्याला नारळ वाहून आणि साष्टांग नमस्कार करून मगच गलबते आणि trawlers पुन्हा कामाला रुजू होतात. समुद्र शांत झालेला असतो, मासे हे पुन्हा जोमाने वाढलेले असतात म्हणूनच हा काळ मासेमारी साठी अगदी उत्तम पण खरा रंग येतो तो नोव्हेंबर – डिसेंबर मध्ये जेव्हा मासे अगदी मोठ्या प्रमणात मिळतात, हा ‘कादव’. कोलीम, आमबाड, सोडे ह्यानी खळी भरलेली असतात. बांबूवर वाकटी, बोंबील, तारली वाळलत असतात. बांबूवर अर्धवट सुकलेला बोंबील कांज्यासाठी तर अतिशय प्रिय आणि म्हणून नावही मजेशीर ‘बांबूके बोंबील’. हा प्रकार खास कोळी घरातच शिजतो, हे बांबूके बोंबील त्याच्या नश्वरतेमुळे बाजारात उपलब्ध नसतात हे कांजी चाखायला तुम्हाला कोळी कुटुंबातून आमंत्रण मिळवावे लागेल.

आपण आत्तापर्यंत सामान्य जेवणाचा आढावा घेतला. आता सण-वार, लग्न-कार्याला आम्ही कोळी काय मेजवाणी बनवतो ते पाहूया. लग्न म्हणजे घारी शिवाय होणार नाही. घारीसाठी, तांदळाचे पीठ उकड काढून, मळून, रात्रभर आंबवून करतात. हे पीठ सकाळी चपटा गोल आकार देउन, मध्ये भोक करून गरम तेलात तळतात. कुणी म्हटले आंबवणे ही आपली भारतीय खाद्यपाधती नाही म्हणून? कुणी म्हटले आंबवणे म्हणजे अमंगल आहे. कोळीतर लग्नाच्य पाहटे घारीचा नैवेद्य आधी देवाला देतात, मग मांडवला घारीचे तोरण बांधतात. नंतर लग्नाची न्याहारी म्हणून खाऊ घालतात. घारी आणि कोलीम – वांगी ही एक अप्रतिम जोडी आहे. हे तसं कोळी खाद्यपदार्थात जास्त लोकप्रिय. दुपारची हळद म्हणजे चक्क होळी सारखी खेळली जाते आणि मग बसते ती पत्रावळीची पंगत.  आधी घारी- कोलीम वांगे मग चावळी बटाटा भाजी, आंबोशीचं लोणचं, तांदळाची फेनी आणि भातावर मास्याचे कांजी! मोठा मासा नेहमीच घोळीला उदेशून वापरला जातो. एक- दोन चार फूट लांब घोळी आणून त्या खास पद्धतीने कापून कांजी केले जाते. ह्या मध्ये आधी दोन्हीं सपाट बाजूने मास काढले जाते. ज्यांना काटे आवढत नाही त्यांच्यासाठी पण खरी मजा तर काट्यात दडलेली असते. मग तो मोठा काटा अश्या पद्धतीनी घावटला जातो की सांधे शाबूत राहतील आणि शेपटी/ पिसारा ही कापला जातो. ह्या पद्धतीनी घावटणयाला काटा पिसारा काढणे म्हणतात. आज ही घावटणयाची कला नाहीशी होत चाली आहे. खाताना संध्यातला रस अगदी दर्दीपणे चोखला जातो.


हल्ली मास्याचे कांजी कमीच दिसते लग्नात. त्याची जागा buffet ने घेतली आहे. हळदीला लोक मटण करू लागलेत. हा बदल मुख्य मुंबईत दिसू लागला आणि आता गावो गावी पसरत चालला आहे.

गोड – धोड कोळी जेवणाबरोबर कधीच खात नाहीत. गोड हे मधल्या वेळचे खाणे. मग एका तांदळाच्या पीठाची उकड काढून त्याचे गुळ, खोबरे घालून अनेक पदार्थ करायचे. कधी पीठाची बोरे तर कधी मूंगोरी. पीठाची बोरे रोजची पण मूंगोरीचे स्थान वरचे. मूंगोरी ही लग्नानंतर दुसऱ्या दिवशी हळद काढतात तेव्हा खास जावयाला भरवतात. भरवतात म्हणजे चक्क पानावर वाढताना तोंडाला फसतात जसा हल्ली cake फसतात ना तसाच. कोळी तसे आतिशय आनंदी जमात!

नारळ किनारपट्टीला अमाप म्हणू नारळीपाक ही बनवलेला दिसतो लग्नरात्री घराव्यांसाठी (नावरदेवाचे मित्र). तसाच शेंगदाण्याची कतली सारखा प्रकार ज्याला बदामपाक ह्या नावाने ओळखला जातो. त्याचे असे आहे की शेंगदाण्याला चीनी बदाम म्हणतात म्हणून असेल कारण सामान्य कोळी माणसाला पूर्वी बदाम परवडण्यासारखे नव्हते.

रोजची न्याहारी मात्र रात्री ची चावलाची रोटी आणि शिळे कांजीच असते अजूनही, गावाकाढे. मुलांना तांदूळ भाजून, जात्यावर दळून व नंतर तुपावर भाजू, गूळ घालून पीठ दिले जात होते हल्ली पाव,खारी biscuit ह्याने आपला कब्जा केलाला दिसतो. कुणी आजारी असेल किंवा आजी आजोबा घरात असतील तर मऊ मऊ तांदळाचे पोळे बनवले जात. हे बनतात ही झटपट.

आपण मासेमारी वर नझर टाकली, आता अन्नपदार्थ शोधण्याकडे लक्ष्य देऊया. शिवली, खुबी, कालवे हे शोधून अणने, हे काम स्त्रियांचे. दुपारी घरची कामे आटपून हातात काती (sickle) घेउन त्या हा दगडावर राहणारा समुद्र मेवा गोळा करतात. शिवल्यांसाठी गुडघ्यापर्यंत चीखालात जातात. विशेष म्हणजे हे सगळे कवच असलेले जीव पावसाळ्यात स्वयंपाकाला ताझेपणा आणतात.

गावी एक नियम आहे जो मुंबईत दिसत नाही. सकाळी रोटी ची न्याहारी, दुपारचे धान नी कांजी आणि रात्री पुन्हा रोटी नी कांजी. असे साधे पण पौष्टिक खाद्यपदार्थ कोळी समाजात आढळतात. जर कोळी खाध्यासंस्कृतीचा गोषवारा करायचा असेल तर हेच म्हणवे लागेल की ही जमात तिच्या भावगोलिक परिस्थीतीशी जोडलेली आहे. वैविध्य येत ते सागरातल्या अमाप प्रकारच्या मास्यांमुळे, लहान - मोठे, शिंपले, खुबे, माकोळ इत्यादी ह्यामुळेच. म्हणून की काय कोळी कधीच मास्याच्या कालवणाला कांटाळत नाही. इतर मासे खाणार समाजाने जरा साहसी बनून नुसते सरंगा, कोलंबी ना खाता विवध प्रकारचे मासे खाल्ले तर सागराकढे देण्याला खूप आहे.

जाता जाता एकच विनंती समुद्र प्रदूषण करू नका नाहीतर तुमचे आवडते मासे मिळणेच बंद होईल!


P.S1: This article was commissioned but withheld from publishing by me. Incase it appears anywhere else unless I have given written permission, it is a breach in copyright. Do let me know if you happen to read it elsewhere.

P.S2: This is the first time I have written in Marathi so keep the comments and critique coming.

4 comments:

  1. Loved the article.. I am South Indian - vegetarian, so I have no idea about koli way of life, even though I lived in Bombay. I am a crazy fan of pu.la and he emphasised on maintaining unique khaadya-sanskruti, I compeletly agree with that. Food is not just calories and vitamins and proteins.. Every bite of chakli should remind you of diwali, every sip of filter coffee should remind you of vidarthi bhavan /MTR and bhel is to be eaten by the road side.. Great article.. Even though this is my first comment, I have been the silent reader since a long time..

    ReplyDelete
    Replies
    1. keep visiting and thank you for taking the time to comment.

      Delete
  2. Lovely write up Anjali tai.. you have beautifully captured a lot about our culture and it is really good and commendable since it has never done before. our way of life (hardworking, brave and courageous, cheerful and merry people, celebrating every possible occasion, our food habits, our love for travel/exploring etc.)

    ReplyDelete
    Replies
    1. Glad you appreciate the effort. It started as a very personal log of events to be broadcasted for family while we were all scattered but as I went along it became a singular passion to understand our culture and food and going back to the roots. I have lived only 8 of my childhood years among our people in Colaba Koliwada while I spent all my vacations in Thal. I mean to take it as far a possible. Keep reading and commenting :)

      Delete

Thank You for taking the time to leave your thoughts here.