Monday, August 19, 2024

STOP चूडा फोड Breaking Bangles


Today I attended one of my favourite Kaka’s funeral. The goodbyes were hard enough.

Even harder were the चूडा फोड Breaking Bangles. It is not a ritual by scriptures but a tradition or practice. A very cruel one!

My kaki’s cries when her bangles were broken absolutely traumatised me. I cannot even imagine what it did to her 😭 She was resisting it. She yelped helplessly as she was stripped off her Saubhagya lakshan or adornments of marriage, her Mangal sutra, her Kunku. Does it have to be done this way? 

I URGE OUR KOLI PEOPLE TO STOP THIS CRUEL PRACTICE. ABOLISH IT !

Let the woman decide whether she wants to keep the adornments or stop wearing. Let it be her wish. Let it be a natural process instead of this Trauma that is inflicted!

When I was leaving Kaki was crying and telling me “see what they have done to me”. See how I look now? For a woman this is like breaking her dignity !

Thank God I did not have to go through this on Arvi’s passing on as Parsis don’t have such a ritual in their religion or community practice. 

**********************************************


आज मी माझ्या आवडत्या काकांच्या अंत्यसंस्काराला गेली होती. निरोप देणच कठीण होते.


काकीचा चूडा फोडणे म्हणजे बांगड्या उतरवणे पाहणे त्याहूनही कठीण होते. हा धर्मग्रंथात कुठे ही निर्देशित केलेला विधी नसून परंपरा / प्रथा आहे. अतिशय क्रूर प्रथा आहे ती!


बांगड्या फोडताना माझ्या काकीचा आक्रोश ह्रदय द्रावक होता. माझ्यावर खूप आघात झाला. मी कल्पनाही करू शकत नाही की ती काय भोगत असेल 😭 ती प्रतिकार करत होती. तिची सौभाग्य लक्षणे, मंगळसूत्र, कुंकू काढून घेतल्याने ती असहायपणे आक्रोशत होती. असे करण्याची गरज आहे का?


मी आमच्या कोळी लोकांना ही क्रूर प्रथा थांबवण्याची विनंती करते. ही प्रथा नष्ट करा!


स्त्रीला ठरवू द्या की तिला अलंकार ठेवायचे आहेत की घालणे बंद करायचे आहे. तिच्या इच्छे प्रमणे जगू द्या तिला. या पीडादायक प्रथेऐवजी ती एक नैसर्गिक प्रक्रिया असू द्या!


मी निघताना काकी रडत होती आणि मला सांगत होती, “बघ त्यांनी माझं काय केलंय. बघ मी आता कशी दिसते?” स्त्रीसाठी हे तिची प्रतिष्ठा भंग करण्यासारखेच आहे!


देवाचे आभार मानते की आर्वींच्या निधनानंतर मला यातून जावे लागले नाही कारण पारशी धर्मात किंवा समाजात ही प्रथा नाही.


No comments:

Post a Comment

Thank You for taking the time to leave your thoughts here.

On Trail